Sunday 19 March 2017

चला नाव नोंदवूया... अनुरुप जोडीदार शोधूया...

 www.marathalagna.in 

चला नाव नोंदवूया... अनुरुप जोडीदार शोधूया... 

मराठा समाज हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ठिक ठिकाणी स्थायिक झालेला दिसून येतो. मराठा समाजातील मुले-मुली उच्चशिक्षित होत चालले असून नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदीमुळे मराठा समाजातील बहुतांश समाज बांधव व भगिनी आपल्या गावापासून परदेशात वास्तवयास जात आहेत. पण त्यांच्या संसारीक प्रश्नाबाबत पालक वर्गात दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे.

      उच्च शिक्षण व नोकरी यामुळे मुला-मुलींच्या अपेक्षांप्रमाणे वर अथवा वधू मिळत नसल्याने वधू-वरांच्या शोधात व अपेक्षेत बसण्यासाठी पालकांची दमछाक होत आहे. आपल्या मुलास किंवा मुलीस योग्य जोडीदार मिळावा ही प्रत्येक पालकांची किंवा वधू-वरांची अपेक्षा असते. म्हणून अनेक वर्षापासुन हे वधु-वर सुचक केंद्र कार्यरत आहे. त्यास मराठा समाजातील सर्व स्तरातील समाज बांधवानी उस्फुर्त साथ दिली. मंडळाकडे सध्या डॉक्टर, इंजिनियर, सरकारी अधिकारी, व्यावसायिक अशा वधू-वरांच्या स्थळांची माहिती उपलब्ध आहे.

      इंटरनेटच्या माध्यमातून भारतच काय पण जगभरातील मराठा समाजास वधू - वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाहयोग्य मनपसंत जोडीदार शोधणे सोपे जावे , या विचारांनी प्रेरीत होऊन हे विवाह विषयक वेब पोर्टल निर्माण केले आहे . पारंपारिक पद्धतीत बराच वेळ खर्च होतो व निर्णय होण्यासही विलंब होतो. सदर वेब साईटच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुयोग्य, उच्च शिक्षित, देश तसेच परदेशातील स्थळे त्वरित व घरच्या घरी पहावयास मिळतील. यातून सर्वांचाच वेळ, श्रम व पैसा निश्चितच वाचेल, त्याचप्रमाणे समाज एकसंघ राहण्यासही मदत होईल. सदर उपक्रमाचा जास्तीत जास्त समाज बंधू-भगिनींनी लाभ घेऊन, आपल्या समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती व समाज एकसंघ राहण्यास हातभार लावावा ही नम्र विनंती. धन्यवाद !   


maratha lagna

 

No comments:

Post a Comment